परिचय

श्री.चैनसुख मदनलाल संचेती महाराष्ट्राच्या राजकिय पटलावरिल हे नाव सुपरिचीत आहे ते संयम आणि कर्तव्यपरायणता यामुळे आजवरच्या आपल्या राजकिय प्रवासात जनसंघापासुन ते भरतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यात महत्वाची भुमिका बजावणारे चैनसुख संचेती हे भाजपच्या जुण्या जाणत्या पदाधिकायांपैकी एक जेष्ठ आमदार आहेत. समाजनिष्टेने प्रेरित होऊन विद्यार्थी दषेपासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व त्यानंतर जनसंघाच्या चळवळीत सहभगी झालेला हा तरूण कार्यकर्ता बिकट परिस्थीतीतही पक्षकार्यात तळमळीने कार्य करित राहीला. एका भीषण अपघातातून मरणाच्या दारातून परत येऊन आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करण्याचे संकल्प आणखी दृढ केले. पुढे, भाजपा नगर सेवक म्हणून प्रत्यक्ष राजकारणाचा त्यांचा सुरु झालेला हा प्रवास बुलढाणा जिल्ह्याातील मलकापूर विधानसभा मतदार संघाचे सलग 25 वर्ष आमदार ते भाजपा महाराष्ट् प्रदेष उपाध्यक्ष म्हणून त्यांच्यातील नेतृत्व गुणांची ओळख करूण देतो. मराठी, हिंदी, राजस्थानी, तामिळ व इंग्रजी भाषा अवगत असल्याने कित्तेक वेळा पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून देशांतर्गत पक्षासाठी केलेले प्रचार कार्य आपल्याला त्यांच्या वक्तृत्व शैलीची ओळख करून देते.या सर्व प्रवासात पक्ष संघटन आणि राजधर्म पाळत समाजहित डोळ्याासमोर ठेऊन ते आजवर धडाडीने कार्यरत आहेत.

एक विद्यार्थी कार्यकर्ता ते लोकप्रतिनिधी किंवा पार्टीचा प्रदेष उपाध्यक्ष म्हणून चैनुभाऊंचा प्रवास अधिक संगर्षमय रोचक आणि तरूणांसाठी प्रेरणादायक राहिलेला आहे. बहुआयामी चैनुभाऊंच्या व्यक्तिमत्वाला अनेकविद्य पैलू आहेत. उत्तम वक्ता, विकासदृष्टी, अभ्यासू वृत्ती, अचुक गुण ग्राह्याता, बलोपासना व क्रीडा प्रेम, विद्यार्थी हितदक्ष, अत्याधुनिक आरोग्य सुविधा निर्माण करण्याचे ध्येय या आणि अशा अनेक गुणांच्या माध्यमातून चैनुभाऊंचे कार्य सिध्दीस जातांना दिसत आहे. त्यामुळेच आजतागायत चैनुभाऊंनी आमदार म्हणून सलग 5 वेळा निवडून येत आपला गड अबाधित राखलेला आहे. यामागचे कारण म्हणजे चैनुभाऊंनी सामान्यातील सामान्य व्यक्तीची घेतलेली काळजी, वैयक्तिक जनसंपर्क, सुख, दुःख, सण, उत्सवसमारंभ इत्यादींच्या माध्यमातुन नागरिकांषी जुळलेली नाळ आणि मतदार संघातील समस्या, प्रष्न, अडचणी सोडवून विकास घडवून आनण्याची प्रचंड इच्छाषक्ती. यामुळेच चैनुभाऊ आजसुध्दा तितकेच लोकप्रिय आमदार, सन्माननिय नेते आणि मनमिळावू व्यक्ती म्हणून प्रसिध्द आहेत.

कौटुंबिक परिचय

श्री चैनसुख मदनलाल संचेती यांचा जन्म १६ डिसेंबर १९५३ साली झाला. वडील स्व.श्री मदनलालजी संचेती आणि आई स्व.श्रीमती मदनबाईजी संचेती यांच्या आपत्त्यां मधून हे सर्वात धाकटे. परिवारातूनच राजकारण आणि समाजसेवेचे बाळकडू लाभलेले आ.संचेती हे सर्वसामान्यामध्ये ‘चैनुभाऊ’ म्हणून सुपरिचीत आहेत. वडिल स्व.मदनलालजी संचेती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावण स्वयंसेवक म्हणून सक्रिय होतो. त्यांचे धाकटे बंधू माजी आ. स्व. किसनलालजी संचेती हे जनसंघाकडून मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार होते, त्यांच्या तालमीत चैनुभाऊंची जडण घडण झाली. पुढे, श्रीमती उज्वलाताईंशी त्यांचे विवाह संपन्न झाले, भाऊंच्या संघर्षयात त्यांचाही बरोबरीचा वाटा आहे. कुटुंब एका मुठीत बांधून त्यात प्रेम आणि आपुलकीची वाढ त्या दिवसं दिवस करत आहे.

शैक्षणिक पात्रता आणि विध्यार्थी जीवन

चैनुभाऊंच प्रार्थमिक शिक्षण आदर्श शासकीय विद्यालय, मलकापूर येथून पूर्ण झाल. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नागपूरला आले. धनवटे कॉलेजमधून बी.एस्सी, नंतर इन्स्टिटयूट ऑफ सायन्स येथून एम.एस्सी इन ऑरगॅनिक केमिस्त्री चे शिक्षण पूर्ण केले, त्या अंतर्गत थैझोलिन संदर्भात रिसर्च आणि शोध केले. या सर्व शैक्षणिक प्रवासात विद्यार्थी परिषदेच्या विविध उपक्रमात, आंदोलनात, मोर्चे, निदर्षने व निवडणुका यात भाऊ नेहमी सक्रिय राहिले. यादरम्यान जनसंघाचे तात्कालीन अध्यक्ष आ.स्व.पं.दिनदयालजी उपाध्याय यांचा प्रत्यक्ष सहवास ही चैनुभाऊना बरेचदा लाभला.

आपल्या विद्यार्थी दषेतील आठवण सांगतांना चैनुभाऊ नेहमी बोलतात की, नागपूर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकांमध्ये सध्याचे केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी व आपण संपूर्ण विदर्भातील महाविद्यालये सभा घेऊन गाजवून सोडली. त्यात मलकापूर येथिल 'जनता महाविद्यालयातील' प्रचारादरम्यानचा प्रसंग ते आवर्जुन बोलतात. म्हणजेच विद्यार्थी दषेपासून सक्रीय राजकारणात सोबत असलेल्या ना.नितीनजी व ना.चैनुभाऊंची ही मैत्रीपूर्ण जोडी वेगवेगळ्याा टप्प्यावरून जात आजही समर्थपणे परस्परांच्या साथीने आपला प्रवास करतांना दिसत आहे.

खेळाडू वृत्ती

लहानपणापासूनच बलोपासना आणि क्रिडा क्षेत्राची आवड असणारे चैनुभाऊ आपल्या विध्यार्थी जीवनात एक उत्कृष्ट कुस्तीपट्टू असून पंचकृषीतील आणि राज्यस्थरीय स्पर्धांमध्ये सुपरिचित खेळाडू म्हणून प्रख्यात होते. तेव्हा चैनुभाऊंना नागपूर विद्यापीठाचा क्रीडा क्षेत्रातील बहुमान ‘विद्यापीठश्री’ पुरस्कार प्राप्त झाला. स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू असल्यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी तळमळीने मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. त्यांच्या पुढाकारानेच मलकापूर मतदार संघात गाव तिथे व्यायामशाळा व तालुका तिथे क्रीडा संकुल हा उपक्रम राबविल्या जात आहे. परिसरात अनेक राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नेहमी आयोजन होत असते. त्याचा फायदा अनेक खेळाडूंना आजवर झालेला पहायला मिळतो आहे. भाऊ वेळोवेळी अनेक योग, तपासणी व आरोग्यशिबिर आयोजित करतात हे शिबीर सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत आणि तिथे हजारोंची उपस्थिती सहजच बघायला मिळते.

संस्मरणीय प्रसंग

पक्ष नेतृत्व आणि जेष्ठ नेत्यांना दैवत मानून त्यांची सेवा करण्याची वृत्ती चैनुभाऊंच्या अंगी सुरूवातीपासूनच पहायला मिळते. याची प्रचिती 1983 च्या प्रचार सभेदरम्यान स्व.अटलजींसोबत झालेल्या संवादावरून येते, या सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून स्व.अटलजी आलेले असतांना त्या सभेचे सुत्र संचालन चैनुभाऊ करीत होते. तेव्हा भाषणआधी अटलजी तरूण वयातील चैनुभाऊंना हसुन विचारतात ‘‘मुझे भाषण के लिये कितना समय दिया गया है?’’ तेव्हा चैनुभाऊ नम्रपणे म्हणतात की "सभा आपकी ही है सारा समय आपका ही है." त्यावर अटलजी मार्मिक उत्तर देतांना म्हणतात की, "सभाषास्त्र के नियम अनुसार संचालक यह सभा का सुत्रधार होता है उसकी इच्छासे ही सभा चलती है तब यह आप निष्चित किजीए की मुझे कितने समय बोलना चाहीये" यावेळी मंचावर हषा पिकला व त्यातून येवढ्याा मोठ्याा नेत्यांमधील नम्र भाव व समोरच्या सामान्य व्यक्तिला आदर देण्याचा गुण चैनुभाऊंमध्ये आपसुकच उतरलेला आजही जाणवतो.

असाच आणखी दूसरा एक प्रसंग म्हणजे 1992 अयोध्या प्रकरणानंतर संपूर्ण देषभर उसळलेल्या जातिय दंगली दरम्यान घडलेला पहायला मिळतो. एका प्रसंगी दंगलीवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देषाने जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज झाला. त्यात भाजपा जेष्ट नेते मा. लालकृष्णाजी अडवाणी यांच्यावर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला त्या प्रसंगी सोबत असलेल्या चैनुभाऊंनी स्वतःला ईजा पोहचेल याची चिंता न करता अडवाणीजींना सुखरूप सुरक्षित ठेवण्यासाठी घडपड केलेली पहायला मिळते.

समर्पण भावनेतून काम करणे ही चैनुभाऊंची कार्यषैलीच झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यात पोटतिडकीने सेवा हाच धर्म हे ब्रिद प्रत्यक्षात उतरण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच 2001 साली गुजरात मध्ये आलेल्या विनाशकारी भुकंपानंतर भुज जिल्ह्याातील सर्व शाळा नव्याने बांधुन देण्याचे कार्य चैनुभाऊंनी यषस्वीरित्या पुर्ण केले म्हणून तात्कालीन प्रधानमंत्री स्व. अटलजी बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते भाऊंचा सन्मान देखील झाला. परंतु केवळ सन्मान व्हावा म्हणून भाऊ या सेवाकार्यात पुढाकार घेत नाहीत तर समाजातील रोगी, कष्टी, अपघातग्रस्त, अपंग, आजारी असा

कुठलाही घटक भाऊंच्या निदर्षनास आला तर त्याला शक्य होईल ती आणि आवष्यक असेल तेवढी मदत ते नेहमी करतात.

या आणि अशा अनेक प्रसंगातून चैनुभाऊंचे कर्तुत्व आणि नेतृत्व बहरत गेलेले दिसते. अनेक जेष्ट-श्रेष्ट आणि जुण्या जाणत्या नेत्यांच्या मार्गदर्षनात तावून सुलाखून हे व्यक्तीमत्व घडत आलेले आहे. आमदार म्हणून आपल्या 25 वर्षाच्या कारकिर्दित भाऊंनी अनेक प्रकारे मतदारसंघात आपला जनसंपर्क नेहमी वाढता ठेवलेला आहे. त्यामुळेच त्यांच्यातील अनेक विध पैलू सर्वसामान्यांना आपलेसे करून जातात. देव-देष-धर्मासाठी सर्वस्व ही षिवरायांची शिकवण अंगिकारण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो

विजयाचे तपशील

आमदार म्हणून आपल्या या संपूर्ण 25 वर्षाच्या प्रवासात चैनुभाऊंनी पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी अतिषय समर्थपणे उचलली आणि तितक्याच यशस्वीरीत्या ती पूर्ण देखील केली. यावरून हेच सिध्द होते की, पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षासोबत खंबिरपणे उभे राहण्याची संचेती परिवाराची परंपरा चैनुभाऊंनी देखील तितक्याच सक्षमपणे पेललेली आहे. 1995 साली चैनुभाऊ पहिल्यांदा अपेक्षा निवडून आले तेव्हा पासून ते आजतागायत गेली पंचविस वर्षे येथिल जनतेने चैनुभाऊंना पर्यायाने भाजपला पाचवेळा निवडूण दिलेले आहे. सत्तेत नसून ही निवडणुकीत भाऊंचे मताधिक्य वाढलेच आहे. २०१४ मध्ये चैनुभाऊ आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा २६००० मतांनी अग्रेसर होते. त्यामुळे सत्ता आल्यानंतर मतदारांच्या अपेक्षा वाढणे सहाजिक आहे. परंतू चैनुभाऊंनी पक्षसंघटनेने दिलेली जबाबदारी शिरसावध मानुन एक आमदार म्हणून यशस्वी कार्य करत मतदार संघाचा विकास नंतर विदर्भा ची प्रगती आणि पुढे महाराष्ट्रभर पक्ष संघटणेकडे लक्ष देऊन आपले कार्य सुरु ठेवलेले आहे.

वर्ष विजेता पक्ष मतदान प्रतिस्पर्धी पक्ष मतदान आघाडी
२०१४ चैनसुख मदनलाल संचेती भाजप ७५,९६५ डॉ.अरविंद वासुदेव कोलते काँग्रेस ४९,०१९ २६,९४६
२००९ चैनसुख मदनलाल संचेती भाजप ६१,१७७ शिवचंद्र तेजराव तायडे काँग्रेस ४९,१९० ११,९८७
२००४ चैनसुख मदनलाल संचेती भाजप ४८,७१९ डॉ.अरविंद वासुदेव कोलते काँग्रेस ४५,८९८ २,८२१
१९९९ चैनसुख मदनलाल संचेती भाजप ४७,१९२ जमादार राशिदखान युसूफखान काँग्रेस ३०,३४६ १६,८४६
१९९५ चैनसुख मदनलाल संचेती अपक्ष ३९,४९२ मोरे साहेबराव सदाशिव जनता दल २६,४७२ १३,०२०

उत्कृष्ट वक्ता

महाराष्ट्राच्या राजकारणात सतत विरोधी बाकांवर बसणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या प्रष्नांसाठी सत्ताधारीसोबत लढतांना चैनुभाऊंनी अवघा महाराष्ट्र अनेकदा पिंजून काढला. अनेक मोर्चे, आंदोलने, निदर्षने यातून तत्कालीन सत्ताधारेंना वेळोवळी जाब विचारण्याचे काम भाऊंनी केलेले आहे. मराठी, हिंदी, राजस्थानी, तामिळ व इंग्रजी भाषा अवगत असल्याने कित्तेक वेळा पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून देशांतर्गत पक्षासाठी केलेले प्रचार कार्य आपल्याला त्यांच्या वक्तृत्व शैलीची ओळख करून देते.

शिवसेना प्रमुख हिंदू हदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा चैनुभाऊंवर विशेष स्नेह होता. भाऊंची मोहित करणारी भाषण शैली, अचूक शब्दफेक, अभ्यासू व मुद्देसुद मांडणी, श्रोत्यांना उत्साहित करणारी शेरो शायरी याचे बाळासाहेब नेहमीच कौतुक करायचे व भाऊंना शेरो शायरी लिहून ठेवण्याचीही सुचना देखील करायचे.

कर्मठ व्यक्तिमत्व : एक शोधात्मक अभ्यास

जगात बुद्धिजीवी व्यक्ती हे सातत्याने नवनवीन शोध करतात व त्याच्या शिखरास किंवा खोलीस पोहचून पी.एच.डी. / डॉक्टरेट पदवी मिळवतात पण एका विद्वानाने एका महानुभवाच्या कार्यावर शोध करून डॉक्टरेट मिळवणे हे त्या महानुभवाच्या व्यक्तिमत्वातील खोली व उंची दर्शवण्यास पुरेशी आहे.

आपल्या लाडक्या चैनुभाऊंच्या विधानभवनातील कार्यावर डॉ.अलकाजी जाधव (पी.एच.डी.) यांनी भाऊंच्या २५ वर्षाच्या कारकिरर्दीवर अमरावती विद्यापिठा अंतर्गत ‘आमदार चैनसुख संचेती यांचे विधानभवनातील कार्य : एक संशोधनात्मक अभ्यास’ या शीर्षकांअतर्गत शोध प्रबंध सादर करून अमरावती विद्यापीठातून पी.एच.डी. पदवी मिळवली.

त्यांच्या त्या शोध प्रस्तावनेत त्यांनि भाऊंच्या समाजकार्याचे आणि कर्तव्यपरायणताचे निरनिराळे प्रसंग व पुरावे मांडलेले आढळतात. त्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न, सामाजिक ऐक्य, गरीब-पीडितांचे प्रश्न, रुग्नांसाठी आर्थिक मदत, रस्ते, सिंचनप्रकल्प, आस्थापितांच्या समस्या, शैक्षणिक सुविधा, सौचालाय, क्रीडासंकुल, रेल्वे सुविधा हे विषय भाऊंनी पोटतिडकीने मार्गी लावलेले दिसून येतात, हे सगळं तेही विरोधकांच्या बाकावर बसून केल्यामुळे भाऊंमधला कुशल प्रशासक आणि कर्मठ जनसेवक आपल्यासमोर येतो. अवघ्या महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याचा त्यांचा हा लढा आजही सुरु आहे.
डॉ.जाधव यांचे प्रबंध डाउनलोड करण्यासाठी

अंत्योदयाचा ध्यास

सामाजिक एक्य निर्माण करण्यात भाऊंचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. त्यात प्रत्येक जाती धर्माच्या सार्वजनिक उत्सवात चैनुभाऊ अत्यंत उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळेच समाजातील प्रत्येक धर्माचा कार्यकर्ता हा भाऊंप्रती कायम आदरभाव व्यक्त करत आलेला आहे. संकट समयी धावून येण्याचा संचेती परिवाराचा वारसा चैनुभाऊ अगदी तळमळीने बजावतांना दिसतात. सर्वसामान्यांच्या जिवनात येणाऱ्या संकटाच्यावेळी पुर, वादळ, अतिवृष्टी, दुष्काळ, आग, भुकंप अशा नैसर्गिक आपत्तींमुळे नागरिकांच्या संसारावर आलेल्या संकटात त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याबरोबरच मानसिक आधार देण्याचे कामही भाऊंनी वेळोवेळी केलेले पहायला मिळते. कारण असाच एक भीषण अपघातातून भाऊ मरणाच्या दारातून परत आलेत ते केवळ एका अज्ञात वाटसरूंच्या मदतीमुळे. म्हणून ते म्हणतात ‘‘माझे संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठीच राहणार आहे’.

भाजपा सरकारच्या अनेक शासकीय यौजनांचा लाभ क्षेत्रातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी चैनुभाऊ नेहमी आग्रही असतात. त्यासाठी आपल्या कार्यालयाद्वारे योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सुविधा, कागद पत्रांबाबत मार्गदर्षन योजनेच्या लाभार्था साठी पाठपूरावा, नव्या योजनांची माहिती पुरवणारी यंत्रणा अशाअनेक माध्यमातून चैनुभाऊ सर्वसामान्यांच्या सोईसाठी तत्पर असतात. परिसराच्या विकासासाठी व जनसामान्यांच्या अडिअडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणेबाबत भाऊंनी वेळोवेळी विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहे व ते तडीस लावण्यासाठी सरकार दरबारीत आवाजही उचललेला आहे. अलीकडच्या काळात गोर गरीब आणि वंचित रुगणांना तब्बल ३८.४ कोटी रुपयांची आर्थिक मदत सरकारच्या विविध योजनांच्या मार्फत चैनुभाऊंनी मिळून दिलेली आहे. कित्तेक देवस्थानांचे जीर्णोद्धार, नवीन मंदिरांची उभारणी, गावोगावी सांस्कृतिक सभागृहांचे निर्माण हे भाऊंच्या हातून घडलेले श्रींचे कार्य आहे. गोर गरिबांसाठी रेल्वेचे थांबे त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी नवीन एसटी महामंडळाच्या बसेस ची मागणी करून ती अस्थित्वात आणणे यासाठी भाऊ नेहमी प्रयत्नशील आहेत.

कुशल प्रशासक आणि संस्थांचा शिल्पकार

आपल्या सामाजिक कार्यात रोजगार निर्मिती,आर्थिक सशक्तीकरण, प्रगत शिक्षण व प्रशिक्षण आणि जनकल्याणाचे धोरण मनस्वी बाळगून भाऊंनी कित्तेक निष्क्रिय व रोगी संस्थ्यांमध्ये प्राण फुंकले त्याचबरोबर अथक परिश्रमाने कित्तेक संस्था उभारल्यास व त्यांचे मार्गदर्शनही करत आहेत. भाऊंच्या मार्गदर्शनखाली व भाऊंच्या हाती धुरा असलेल्या काही संस्था:

१) गो.वि.महाजन कनिष्ठ महाविद्यालय
२) के.के. अग्रवाल महाविद्यालय
३) मलकापूर एजुकेश सोसायटी
४) स्व.मदनलालजी किसनलालजी संचेती सेवा समिती आदर्श विद्यालय, उमाळी
५) स्व.सरस्वतीबाई अर्जुनराव वानखेडेआदर्श महाविद्यालय, शेलगांव मुकुंद ता.नांदुरा
६) भिकमचंद गांधी विद्यालय, सावरगांव नेहू
७) आदर्श विद्यालय, मानेगांव ता. जळगांव जामोद
८) आदर्श विद्यालय आलमपूर ता.नांदुरा
९) आश्रमशाळा, वाघोळा
१०) कॅटल ब्रीडिंग डेअरी फार्म
११) संजय गांधी निराधार योजना
१२) दक्षता समिती
१३) बृहन महाराष्ट्रायोग परिषद, महाराष्ट्र राज्य
१४) वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणी, मलकापूर
१५) कृषी उत्पन्न बाजार समिती.
१६) मलकापूर अर्बन बँक
१७) महाशक्ती डेअरी फार्म

त्वरित अँप डाउनलोड करा!